“स्व”आनंदासाठी आत्मनिर्भर व्हा !
आयुष्यांत इतर कोणत्याही गोष्टींसाठी एक वेळ तुम्ही इतरांवर अवलंबून राहिलात,तडजोड
केलीत तरी चालेल ,पण
आनंदासाठी नाही. कारण “तुमचा ’आनंद’ हा फक्त आणि फक्त तुमचाच असतो हे कायम लक्षांत असूं द्या व त्यासाठी
कधीही इतरावर अवलंबून रहात जाऊ नका. ज्या गोष्टीने तुम्हाला आनंद लाभेल त्या
गोष्टीने तो तसाच इतरांनाही लाभेलच अशी खात्री नाही देता येत , म्हणूनच जे केल्याने तुमच्या मनाला आनंद वाटेल ते करण्यासाठी मागचा-पुढचा
कसलाही विचार करत बसूं नका. मुक्तपणे आनंद लुटा.
तुम्हाला ज्या गोष्टींत रस असेल रुचि-आवड असेल,
जो काही छंद-विरंगुळा असेल,मन आनंदी होत असेल मग इतरांच्या दृष्टीने
कदाचित तो वेडेपनाही असेल तरीही त्यांत सर्वस्व झोकून देऊन वैयक्तिक
पातळीवर ती गोष्ट/आवड/छंद पुर्ण करण्याचा सदैव आटोकाट प्रयत्न करत रहा. इतरांना काय वाटेल ? याचा विचार करत बसून कच खाऊ नका तर स्वत:चे मन काय कौल देते त्याला जास्त
महत्व देत जा. म्हणतात ना ‘ ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे’ हेच सत्य आहे. या बाबतीत
स्वा. सावरकर म्हणतात त्याप्रमाणे “ सहभागी झालात तर तुमच्यासह पण नाही झालात तर
तुमच्या शिवाय आणि जरी विरोध केलात तरी त्याला न जुमानता “ मी माझा आनंद मिळवणारच
! अशा वृत्तीने वागत जा व लोकमान्य
टिळकांप्रमाणे “आनंद मिळवणे हा
माझाजन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच” असे खंबीरपणे म्हणून कृती करा.
आनंदाच्या प्राप्तीसाठी कदापिही इतरांवर अवलबून न रहाता ‘स्वयंनिर्भर’ व्हा , ‘स्वमग्न’ रहा.तुमचा स्वभाव जर भिडस्त असेल तर कदाचित सुरवातीला हे जरा कठीण
वाटेलही पण दृढपणे , कटाक्षपूर्वक वागून व अथक प्रयत्न करून
हे एकदा साध्य करून घ्याच आणि मग पहा कसे वाटते ते !
वाचा आणि विचार , कृती व आचरण करा.
No comments:
Post a Comment