कुटाच्या
(तळणीच्या) मिरच्या
कृती : डाळी १/२ तास भिजवून त्यात हळद, सैंधव आणि चमचाभर तेल घालून वाफवून गार कराव्या, त्यात बडीशेप, जिरे, मीठ, साखर घालून एकजीव करावे, धणे, मोहरी, मेथीदाणे, बडिशेप,जिरे हे सर्व साहित्य एकत्र करून मिनिटभर भाजून घा व मग त्यात हळद, पावडर हिंग व आमचूर पावडर मिसळून मिक्सरमधून दळून पूड करा. तीन भाग दळलेला मसाला आणि दोन भाग मीठ असे प्रमाण घेऊन त्यात सैंधव मीठ +साखर+आले-लसूण पेस्ट +वाटल्यास दही घाला,नाही घातले नाही तर चालेल. हा सर्व एकत्र करून मसाला करा. मंडईत खास तळणीसाथी योग्य म्हणून मिळणार्या जाड सालीच्या हिरव्या मिरच्यांना चीर देऊन आतून पोकळ करून घेऊन त्यात हा मसाला दाबून दाबून भरा व एका पसरट भांड्यात तेल सोडून मिरच्या लावाव्यात, वेळोवेळी उलटत झाकून वाफवून घ्याव्यात, शेवटी थोडावेळ उघड्या भांड्यात परतत चुरचुरीत करून घ्याव्यात, सुमारे २-३ मिनिटे लागतील, मग २-३ उन्हे देऊन खडखडीत वाळवा. तळतेवेळी ह्या मिरच्या आगोदर तेल लावून मगच तळाव्यात.
|
No comments:
Post a Comment