मावळी काकडीचे थालीपीठ
साहित्य : एका मोठ्या
मावळी काकडीचा कीस , त्यात मावेल तेव्हढे ज्वारीचे पीठ , चवीपुरते लाल तिखट, मीठ, हळद, हिंग व थालीपीठ लावण्यासाठी तेल
कृती
: एका मोठ्या परातीत मावळी काकडीचा कीस घेऊन त्यात चवीनुसार लाल
तिखट, मीठ व थोडीशी हळद आणि हिंग घालून अर्धा तास झाकून ठेवा. मीठामुळे काकडीला चांगले पाणी सुटेल॰ अर्ध्या तासाने काकडीला चांगले पाणी
सुटल्यावर त्या पाण्यात मावेल इतपतच ज्वारीचे पीठ घालून भाकरीला मळतो तसे पीठ मळून
घट्ट गोळा बनवा. आता तव्यावर थोडेसे तेल घालून त्यावर पिठाचा मध्यम गोळा ठेऊन
हातानेच भाकरीप्रमाणे व त्या आकारात सारख्या जाडीने थापा. बोटाने मध्यभागी एक व
कडेने गोलाकार तीन अशी भोके पाडा व चमच्याने त्या प्रत्येक भोकात थोडेसे तेल सोडा. नंतर झाकण ठेवून तवा गॅसवर ठेवा. ४-५ मिनिटांनी झाकण काढा व उलथण्याने थालीपीठ तव्यावर
उलटे करा व दुसर्या बाजूने २-३ मिनिटे ठेवा. तांबूस रंग आल्यावर गरम थालीपीठ एका डिशमध्ये घेऊन सॉस, गोड दही, लसणाची चटणी, खाराच्या मिरच्या अगर लोणच्याबरोबर खायला द्या.
nice
ReplyDelete