स्वयंपाक घरातील उपयुक्त टीप :
Search This Blog
Tuesday, 14 June 2022
स्वयंपाक घरातील उपयुक्त टीप :
Monday, 13 June 2022
फ्रिजचा वास जाण्यासाठी काही उपाय
फ्रिजचा वास जाण्यासाठी
काही उपाय
फ्रीज स्वच्छ, पुसून ,सुकवून
घेऊन नंतर फ्रीजमध्ये सगळे अन्न झाकून ठेवले तरीही एक वेगळाच उग्र नकोसा वास
फ्रीजमध्ये येतो. दूध फ्रीजमध्ये ठेवलं की त्या दुधाचा चहा पिऊ नये इतका त्या
फ्रिजचा वास दुधाला येतो.. अशावेळी खालील पैकी एक उपाय करा.
१. १. फ्रिजमध्ये
कायमस्वरूपी दोन लाकडी कोळसे ठेवावेत , कुठलाही उग्र वास टिकत नाही.
२. २. एका
वाटीत खायचा सोडा घालून ती वाटी उघडीच फ्रिज मध्ये ठेवा. वास जाईल.
३. ३. फ्रिज
ऑटोमॅटिक डिफ्राॅस्टवाला असेल तर बटन
दाबून डिफ्राॅस्ट करावा लागतो.
(बटन
दाबून डिफ्राॅस्ट करावा लागत असेल तर फ्रिजच्या पाठीमागे खालील बाजूस जे पाणी
साठते ते काढून घ्यावे लागते. त्याचा देखील वास येऊ शकतो)
४. ४. वर्तमानपत्राचा
कागद थोडासा भिजवून त्याचा गोळा करून ठेऊन द्या. आज ठेवलेला पेपर दुसऱ्या दिवशी
टाकून द्या असे चार पाच दिवस करा.
५. ५. एक वाटी
पाण्यात व्हिनेगर आणि लिंबू रस मिसळून ठेवून द्या...हळूहळू वास कमी होईल व जाईल.
६. ६. लिंबाचे
दोन भाग कापून ते ठेवा फ्रिजमधे.सगळा वास निघून जाईल.
७. ७. फ्रिजमध्ये
दूध सांडले आसेल तर वास येतो. त्यासाठी पाणी
व विम लिक्वीड लाऊन फ्रीज स्वच्छ पुसून काढा.
Friday, 3 June 2022
तांदळाच्या दिवशी,निवगर्या
तांदळाच्या दिवशी,निवगर्या