बीटच्या  पुऱ्या 
साहित्य: दोन वाट्या
कणिक, एक मध्यम
आकाराचा बिटचा  कंद  उकडून व किसून ,मोहनसाठी  साजूक तूप, चवीनुसार मीठ व
तिखट  
कृती : एका परातीत कणिक
घेऊन त्यात उकडून किसलेला बीटाचा  कीस, साजूक
तुपाचे मोहन ,मीठ व तिखट घालून पीठ घट्ट मळून घ्या. मळून घेतलेला पीठाचा गोळा  ओल्या सुती  कापडाने  झाकून मुरत ठेवा. 
तासभराने  मुरलेली  कणिक  चांगली
तिंबून घ्या. 
उंडे (गोळे)  करून पुऱ्या लाटा. 
गॅसवरती एका  कढईत तेल अगर वनस्पती तूप गरम करून पुऱ्या तळून काढा.

 
