मेथी मलई मटर पनीर
साहित्य : २ कोवळ्या
ताज्या मेथीच्या जुडया(निवडून,स्वच्छ धुवून व चिरून),१०० ग्राम खवा,२०० ग्राम फ्रेश क्रीम,१ कप दूध,२०० ग्राम हिरवा मटार,१०० गाम पनीरचे छोटे छोटे तुकडे २ मोठे कांदे (बारीक चिरून),१ मोठा चमचा टोमॅटो
प्यूरी,छोटा अर्धा चमचा गरम मसाला, छोटा अर्धा चमचा हळद,२ मोठे चमचे तेल,चवीनुसार मीठ
कृती : ओला हिरवा मटार व
बारीक चिरलेली मेथी सळसळत्या उकळत्या पाण्यात २ मिनिटे घालून उपसून घ्या. एका कढईत
तेल घालून गॅसवर ठेवा व त्यात बारीक चिरलेला कांदा घाला व सोनेरी गुलाबी रंगावर
परतून घ्या नंतर त्यात हळद घालून हलवा,मग त्यात प्रथम मटार घालून हलवा व नंतर खवा कुस्करून घाला व हलवा ,नंतर टोमॅटो प्युरी
घालून हलवा व अखेरीस दूध घाला व शिजवत ठेवा. १-२ उकळ्या येऊन गेल्यावर त्यात
उकळत्या पाण्यातून काढून घेतलेली मेथी घालून २-३ मिनिटे शिजवूत घेतल्यावर गरम
मसाला घालून हलवा व कढई खाली उतरवून ५ मिनिटे झाकून ठेवा॰
सर्व्ह करतेवेळी फेटलेले
फ्रेश क्रीम घालून सर्व्ह करा.
No comments:
Post a Comment