Tuesday 31 March 2015

मसाला-बटाटा ब्रेड टोस्ट सँडविच

मसाला-बटाटा ब्रेड टोस्ट सँडविच


साहित्य: एक स्लाईस  ब्रेड , ४ते ५ टेस्पून अमूल बटर , सॅंडविचमध्ये भरण्याचे सारण म्हणून दोन वाट्या मटार-कांदा-बटाट्याची झणझणीत मसाला भाजी,फोडणीसाठी: १ टीस्पून तेल, चिमूटभर मोहोरी ,जिरे,चिमूटभर हिंग, १/४ टीस्पून हळद , ४ ते ५ कढीपत्ता पाने (बारीक चिरून),दोन चमचे आले-लसूण पेस्ट,चवीनुसार मीठ,एक वाटी हिरवी कोथिंबीर-खोबर्‍याची चटणी

कृती :
सॅंडविचमध्ये भरण्यासाठी सारण-मसाला (भाजी) : बटाटे सोलून मॅश करून घ्यावेत. गॅसवर एका कढईत तेल गरम करून घेऊन मोहोरी,जिरे,हिंग, हळद आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. त्यात हिरवी मिरची पेस्ट आणि आलेलसूण पेस्ट घालून १५ सेकंद परतावे. कांदा घालून परतावे आणि झाकण ठेवून मिनिटभर शिजू द्यावे. नंतर मटार घालून झाकण ठेवून मटार शिजू द्यावे. शेवटी  मॅश केलेले बटाटे घालावे. मिक्स करावे आणि वर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून झाकण ठेवून २-३ मिनिटे वाफ काढावी.
ब्रेड स्लाईसच्या एका बाजूला बटर लावावे. अमूलचे बटर लावलेल्या ८ पैकी ४ स्लाईस घेवून त्याला चटणी लावावी.
चटणी लावलेल्या ब्रेडवर तयार मसाल्याचा पातळ थर लावून घ्यावा. त्यावर कांद्याची एक चकती ठेवावी. वरती बटर लावलेला ब्रेड स्लाईस ठेवून किंचित प्रेस करावे.
बाहेरून थोडेसे बटर लावून सॅंडविच टोस्टरमध्ये सॅंडविच टोस्ट करून घ्यावे

गरम सॅंडविच हिरवी चटणी किंवा टोमॅटो केचपबरोबर सर्व्ह करावे.



No comments:

Post a Comment