Thursday, 8 September 2016

उपासाची गोड कचोरी


उपासाची गोड कचोरीसाहित्य : दोन रताळी (उकडून कुस्करून घ्यावीत) , एक वाटी शिंगाड्याचे  पीठ , चवीपुरते मीठ व तळणीसाठी तेल
सारण : १ कप ताजा खोवलेला नारळाचा चव , चवीनुसार ३-४ हिरव्या मिरच्या व मीठ  (मिरच्या बारीक चिरलेल्या किंवा ठेचुन घ्याव्यात) , १/२ टीस्पून जिरे , १ टीस्पून साजूक तूप , एक चमचा तीळ , १० -१२ बेदाणे , १ चमचा साखर (ऐच्छिक)
कृती : प्रथम रताळी उकडून व सोलून घेऊ एका काचेच्या बाउलमध्ये कुस्करून ठेवावीत.त्यात चवीनुसार मीठ आणि शिंगाड्याचे पीठ घालावे व गोळा बनवावा.
गॅसवर एका कढईत साजूक तूप गरम करावे,त्यात जिरे, हिरवी मिरची,बेदाणे  आणि नारळाचा खोवलेला चव  घालावा,चविसाठी थोडेसे  मीठ आणि थोडीशी साखरही घालावी. मंद आंचेवर नीट परतून घेऊन कोरडे सारण बनवावे. मळलेल्या पीठाचे लिंबाच्याच्या आकाराचे (साधारणपणे १”) गोळे बनवावे, त्यात पुराणासारखे  सारण घालून गोल कचोरी बनवावी अशाप्रकारे सर्व कचोर्‍या बनवून त्या कचोर्‍या  मध्यम आचेवर तेलात/ साजूक तुपात तळाव्यात.
झार्‍याने हलवून कचोर्‍या सर्व बाजूंनी सोनेरी रंगावर तळून काढाव्यात.
दह्यासोबत किंवा हिरव्या चटणी बरोबर सर्व्ह कराव्यात.