Friday 28 September 2018

#बीटचा #ठेचा

#बीटचा #ठेचा

साहित्य : एक छोटे बीट,चवीनुसार २-३ लाल ओल्या मिरच्या,८-१० लसुन पाकळया,चविनुसार मीठ, फोडणीसाठी एक टेबलस्पून तेल,एक छोटा चमचा मोहरी,अर्धा चमचा जिरे,अर्धी मूठ बारीक चिरलेली कोथिंबीर , दोन चमचे लिंबाचा रस.
कृती : बीट, मिरच्या ,लसूण आणि मीठ एकत्र करून मिक्सरवर चांगले बारीक वावाटून घ्यावे. (बीट घेताना साल काढून तुकडे करुन मग घ्यावे)
नंतर गॅसवर एका छोट्या कढल्यात फोडणीसाठी तेल गरम करावे व त्यात जीरे आणि मोहरी फोडणीला घालवे थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी आणि मग वाटण घालवे व गॅसवर थोडे परतून घ्यावे. शेवटी शेवटी लिंबाचा रस घालावा.
आपला बिटचा ठेचा तैयार आहे


हा ठेचा फ्रीजमधे तेवल्यास १०-१५ दिवस मस्त टिकतो.