Tuesday 24 July 2018

#आलु #छेला (कच्च्या बटाट्याचे #धिरडे)

#आलु #छेला (#कच्च्या #बटाट्याचे #धिरडे)


साहित्य : एक मोठा बटाटा,दोन टेबलस्पून बेसनाचे (चणा डाळीचे) पीठ,एक टेबलस्पून तांदूळाची पिठी किंवा रवा,
एक चमचा आलं, मिरची, लसूण  यांची पेस्ट,चवीनुसार मीठ,अर्धा चमचा जिरे व ओवा,मूठभर पालक  बारीक चिरून (ऐच्छिक),कांदा बारीक चिरलेला,
कृती : कचच्च्या बटाट्याची सालं काढुन तो किसणीवर किसुन घ्यावा व पांच मिनिटे मिठाच्या पाण्यात भिजत घालून  ठेवा. 
पांच मिनिटांनी हाताने पाणी पिळून काढा आणि  किस एका बाऊलमध्ये  घ्या. आता त्या बटाट्याच्या किसामध्ये बेसन पीठ, तांदूळाची पिठी किंवा रवा, आलं मिरची लसूण यांची पेस्ट, मीठ, ओवा, जिरे, बारीक चिरलेला पालक (ऐच्छिक) व कांदा घालून नीट मिक्स करा. 
आता गॅसवर डोश्याचा तवा गरम करून त्यावर तेल घालून डावेने मिश्रण घाला व जाडसर पसरवा, वरून तेल सोडून दोन्ही बाजूनी भाजून घ्या.
गरमा गरम आलु छेला (कच्च्या बटाट्याचे धिरडे) चटणी, दही किंवा टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करा.

#ओनियन #रिंग्स

#ओनियन #रिंग्स
साहित्य : एक मोठा कांदा,एक चमचा मैदा,एक वाटी ब्रेड क्रम,पाव वाटी कॉर्न फ्लोअर,चिमूटभर बेकिंग सोडा,एक टेबलस्पून तेल,चवीनुसार मीठ,चवीपुरते लाल मिरचीचे तिखट,पीठ भिजवण्यापूरते पाणी,एक टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर.
कृती : कांद्याचे पातळ स्लाइस करून ठेवा. एका बाउलमध्ये मैदा,ब्रेड क्रम, कॉर्न फ्लोअर,मीठ,तिखट,बारीक चिरलेली कोथिंबीर व चिमूटभर बेकिंग सोडा एकत्र घेऊन त्यात थोडेसे पाणी घाला व भज्यांसाठी भिजवतो तेव्हढेच पातळ पीठ भिजवा.
गॅसवर एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवा.तेलाला उकळी आली की आंच मध्यम करा. एका ताटात ब्रेड क्रम पसरा व कांद्याच्या स्लाइसणा सगळीकडे चोळून लावा आणि ते स्लाइस भिजवलेल्या भज्यांच्या पिठात बुडवून घेऊन पॅनमधील तेलात दोन्ही बाजूंनी गोल्डन ब्राऊन रंगावर शॅलो फ्राय करून काढा.


आवडत्या चटणी सोबत सर्व्ह करा.