Friday 25 May 2018

#कोयाडं

कोयाडं


(पिकलेल्या आंब्यांपासून बनवला जाणारा चविष्ट खास उन्हाळी स्पेशल-प्रकार) 


साहित्य : १०-१२ छोटे छोटे पिकलेले आंबे,फोडणीसाठी : दोन टेबालस्पून तेल,४-५ लाल सुक्या मिरच्या,अर्धा चमचा मेथीचे दाणे,एक चमचा मोहरी,एक छोटा चमचा जिरे,एक छोटा चमचा हळद,एक छोटा चमचा हिंग,दोन वाट्या गूळ, एक छोटा चमचा मीठ,एक वाटी नारळाचे दूध.
कृती : प्रथम प्रेशर कुकरमधून आंबे सालासकट दोन तीन शिट्यावर उकडून घ्या. कुकरचे प्रेशर कमी झाल्यावर आंबे बाहेर काढून सोलून ठेवा.
दुसरीकदे गॅसवर एक पॅनमध्ये फोडणीसाठी तेल गरम करून घेऊन त्यात जिरे व मोहरी घालून दोन्ही चांगली तडतडल्यावर त्यात मेथीचे दाणे घाला व ब्राऊन रंगावर परतून घ्या आणि मग त्या फोडणीत लाल सुक्या मिरच्या,हिंग व हळद घालून एखादे मिनिट परतून घ्यावं नंतर त्यात उकडून साले काढलेले आंबे व एक वाटी नारळाचे दूध घाला. चवीनुसार मीठ व भरपूर गूळ घालून तो पूर्ण विरघळल्यावर एखादी उकळी काढून गॅस बंद करा.
गरम चपाती किंवा पोळी बरोबर कोयीसकट सर्व्ह करा.  

No comments:

Post a Comment