Wednesday, 16 May 2018

हितगुज मनीचे सांगती

या समूहाचे सदस्य मित्रहो,
आज आम्ही उभयता आमच्या मनीचे हितगुज सांगतो,लक्षपूर्वक वाचा...
गोडं वरण-भात, लोणकढं साजूक तूप, आणि लिंबू ....
जिर्‍याची फोडणी असणारं आमसूलाचं सार आणि भात
मटकीची खमंग व चटकदार उसळ आणि पोळी....
पीठलं किंवा झुणका भाकर मिरचीचा खर्डा आणि कांदा....
अस्सल सोलापूरी शेंगदाणा चटणी, घट्ट मटका दही आणि ज्वारीची भाकरी...
पिठलं भात...
भाजणीचे थालीपीठ वर लोण्याचा गोळा किंवा सायीचे दही,
सोलकढी,टोमॅटोचे सार,मसाले भात,आळूचे फतफते,श्रीखंड-पुरी,
वांग्याचं चमचमीत भरीत आणि गरमागरम भाकरी ...
बिरड्या / डाळिंबीची उसळ , पुरी-बटाट्याची भाजी,शेव-भाजी,सुरळीच्या वड्या,मेथी मलई मटर,खमंग काकडी आणि साबूदाण्याची खिचडी,
कांदा पोहे,तांदळाच्या पिठाच्या आंबोळ्या (घावन)
माशांचं कालवण आणि भात...
मटार उसळ आणि पाव,
मेथीची किंवाअंबाडीची भाजी वर लसणाची फोडणी आणि भाकरी
गावरान कोंबडी आणि भाकरी..
खानदेशी मटन...
...या आणि अशा असंख्य मराठी मातीतील अस्सल,
खमंग आणि रूचकर पदार्थांची गोडी एकदा का
घरातल्या मुलांना लावलीत ना, तर माझी पक्की खात्री आहे की तमाम
मॅकडोनाल्ड, केएफसी आणि फास्ट फुड काॅर्नर्स बंद पडायला वेळ लागणार नाकी,काही दिवसातच ती नक्कीच बंद पडतील.
सर्व मराठी भगिनी / माता /गृहिणींनी
वर वर्णन केलेले आणि असे असंख्य मराठी
पदार्थ मनापासुन शिकून घ्यावेत अशी आमची प्रेमाची व कळकळीची विनंती नव्हे आग्रह आहे.
तुम्ही ज्या भौगोलिक वातावरणात आणि
प्रदेशात रहाता तिथल्या पारंपरिक
खाद्यपदार्थांचा तुमच्या आरोग्याशी,
पचनयंत्रणेशी आणि पर्यायाने निरामय
दीर्घायुष्याशी निकटचा संबंध असतो हे कायम लक्षात असू द्या.

प्रमोद व सौ. नीता तांबे