Thursday 15 March 2018

कढीपत्त्याची ओली चटणी

कढीपत्त्याची ओली चटणी



साहित्य : दोन वाट्याभरुन  कढीपत्त्याची पाने,अर्धी वाटी ओल्या नारळाचा चव,एक टेबलस्पून तेल,चवीनुसार ३-४ हिरव्या मिरच्या,१-२ लाल सुक्या मिरच्या,दोन टेबलस्पून घट्ट चिंचेचा कोळ,एक टेबलस्पून किसलेला गूळ,एक चमचा चण्याची (हरभरा) डाळ, एक चमचा उडदाची डाळ,एक छोटा चमचा मोहरी, एक छोटा चमचा जिरे,अर्धा छोटा चमचा हिंग व चवीनुसार मीठ.
कृती : कढी पत्त्याची पाने दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या व चाळणीत घालून पाणी निथळून  कोरडी करून घ्या. 
गॅसवर एक फ्राय पॅन मध्ये एक छोटा चमचा तेल गरम करून तेल चांगले गरम झाल्यावर त्यात मोहरी व जिरे घाला व दोन्ही चांगले तडतडल्यावर चणा व उडदाची डाळ घालून परता व दोन्ही डाळी वाफेवर शिजू द्या. परतून दोन्ही डाळी ब्राऊन रंगाच्या झाल्या की त्यात लाल मिरचीचे तिखट व हिंग घालून दोन मिनिटे पुन्हा परतून घ्या. मग हे परतलेले मसाले एका बाऊलमध्ये काढून ठेवा.
आता पॅनमध्ये उरलेले तेल घाला व तेल गरम झाल्यावर त्यात कढीपत्त्याची पाने घाला व दोन मिनिटे सारखे झार्‍याने हलवत राहून परतत रहा. परतत असतांनाच त्यात ओल्या नारळाचा चव व हिरव्या मिरच्याचे तुकडे घाला व एक मिनिट परतून घ्या.
परतून घेतलेली कढीपत्त्याची पाने,डाळी व मसाले हे सगळे साहित्य व त्या सोबत चेचा कोळ,गूळ , मीठ व पाव वाटी पाणी मिक्सरच्या ग्राइंडरच्या भांड्यात  घालून मिक्सरमधून बारीक चटणी वाटून घ्या.
खूप स्वादिष्ट अशी कढीपत्त्याची हिरवी चटणी तयार झाली आहे.
ही चटणी इडली,डोसा किंवा भजी यांच्या सोबत सर्व्ह करा.
.


No comments:

Post a Comment