Thursday 29 March 2018

कांद्याची पीठ पेरून भाजी

कांद्याची पीठ पेरून भाजी


ही अतिशय कमी वेळांत झटपट होणारी सुकी भाजी आहे.
साहित्य : चार माध्यम आकाराचे कांदे,चार टेबलस्पून चणा डाळीचे (बेसन) पीठ, चवीनुसार लाल तिखट,मीठ व साखर,फोडणीसाठी तेल,मोहरी,जिरे,हळद व हिंग,बारीक चिरलेली कोथिंबीर  
कृती : कांड्यांची साले काढून चिरून घ्या. गॅसवर एका कढईत फोडणीसाठी तेल तापवून घेऊन त्यात मोहरीव जिरे टाका. ते चांगले तडतडल्यावर त्यात हळद व हिंग घालून एक मिनिट परतून घ्या व मगत्यात चवीनुसार तिखट,मीठ व साखर घालून पुन्हा एक मिनिट परता. आता चिरलेला कांदा घालून परतून घ्या व झाकण ठेवून दोन-तीन मिनिटे कांदा शिजवून घ्या. झाकण काढून शिजलेल्या कांद्यावर हाताने पीठ भुरभुरत रहा. भाजीला पीठ लावताना एकीकडे उलथण्याने भाजी हलवत रहा. पीठ लावून झाले की एक वाफ काढून घेऊन वर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून भाजीवर झाकण ठेऊन गॅस बंद करा.  
पोळी बरोबर ही भाजी सर्व्ह करा.

No comments:

Post a Comment