Wednesday 21 March 2018

आलू-पालक स्टफ्ड पराठे

आलू-पालक स्टफ्ड पराठे


साहित्य : पराठ्याच्या आंतील सारणासाठी : दोन मोठे उकडलेले बटाटे,एक जुड्डी पालकची कोवळी पाने, एक मध्यम कांदा-बारीक चिरून,एक चमचा आले-लसूण-हिरवी मिरचीची पेस्ट,चवीनुसार मीठ,अर्धी वाटी तेल.
आवरणासाठी : दोन वाट्या कणीक,तेल , मीठ व गरजेनुसार पाणी.
कृती : उकडलेले बटाटे किसून ठेवा, कांदा अतिशय बारीक चिरून ठेवा. 
एका परातीत पारीसाठी (आवरणासाठी) कणीक घ्या,त्यात मीठ , तेल व जरूर तेव्हढेच पाणी घालून नेहमी पराठ्यासाठी भिजवतो त्याप्रमाणे आरवरणाचे पीठ भिजवून ठेवा.
आता गॅसवर एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्या. मग त्या गरम तेलात बारीक चिरलेला कांदा घालून सोनेरी ब्राऊन रंगावर परता. नंतर त्यात आले-लसूण-हिरवी मिरचीची पेस्ट घालून पुन्हा दोन मिनिटे परतून घेऊन मग त्यात कोवळी पालकची पाने घालून पुन्हा २-३ मिनिटे परता.आता उकडलेल्या बटाट्याचा कीस व चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्या व ३-४ मिनिटे परतून घेऊन गॅस बंद करा. थंड झाल्यावर पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घ्या. स्टफिंग म्हणून पराठ्याचे आंत भरावचे सारण तयार आहे.
भिजवून तयार ठेवलेल्या पिठाचा एक लाडवा एव्हढा गोळा पोळपाटावर लाटून त्यात तयार करून ठेवलेले सारण भरा व पराठा लाटून घेऊन तापलेल्या तव्यावर दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून काढा. पराठा भाजातांना बाजूंनी थोडे तेल सोडा.
गरम पराठे दही व हिरव्या कोथिंबीरीच्या चटणीसोबत सर्व्ह करा.
हे आलू-पालक पराठे खूपच स्वादिष्ट लागतात.व भरगच्च नाश्ता म्हणून कामी येतात.

No comments:

Post a Comment