Tuesday 7 March 2017

ज्वारीचा उपमा


 


 
ज्वारीचा उपमा

साहित्य : दोन वाट्या ज्वारी,एक बारीक चिरलेला कांदा,एक बारीक चिरलेले गाजर,पाव वाटी मक्याचे कोवळे दाणे, पाव वाटी मटारचे कोवळे दाणे,दोन टेबलस्पून भट्टीवर भाजलेले शेंगदाणे,एक छोटा चमचा आल्याचा कीस,४-५ लसणाच्या पाकळ्या (ठेचून) , एक चमचा लिंबाचा रस,चवीनुसार मीठ,एक छोटा चमचा लाल मिरचीचे तिखट,एक छोटा चमचा हळद,दोन टेबलस्पून तेल,चार वाट्या व्हेजिटेबल स्टॉक किंवा उकळते पाणी,अर्धी मूठ बारीक चिरलेली कोथिंबीर व मूठभर ओल्या नारळाचा खोवलेला चव.  
कृती : आदल्या रात्री  ज्वारी पाण्यात भिजत घालून ठेऊन दुसर्‍या दिवशी सकाळी चाळणीवर उपसून निथळून घ्यावी व प्रेशर कुकरमधून दोन शिट्ट्यावर शिजवल्यावर १० मिनिटे मंद आंचेवर ठेवून मग गॅस बंद करावा. प्रेशर जाऊन कुकर थंड झाला की झाकण काढून ज्वारी शिजून नीट मऊ झाल्याची खात्री करून घ्यावी.
दुसरीकडे इतर भाज्या वाफवून ठेवा.
  आता गॅसवर एका कढईत फोडणीसाठी तेल गरम करून घ्या.  मग त्यात चिरलेला कांदा व आले-लसणाची पेस्ट घालून मध्यम आमचेवर  परता. परतून कांदा पारदर्शक व मऊ शिजला की त्यात भाजलेले शेंगदाणे घाला व आणखी एखादे मिनिट परता. नंतर त्यात वाफावलेल्या भाज्या , हळद,मीठ,तिखट  घालून पुन्हा एकदा दोन मिनिटे परतून घ्या. शेवटी कढईवर झाकण ठेवून पांच मिनिटे शिजवून घेतल्यावर गॅस बंद करा.
पांच मिनिटांनी कढईवरचे झाकण काढूब लिंबाचा रस घालून मिक्स करा.
सर्व्ह करतेवेळी सर्व्हिंग डिशेसमध्ये उपमा काढूब घेतल्यावर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर व ओल्या नारळाचा खोवलेला चव घालून गरम उपमा सर्व्ह करा.



Sunday 5 March 2017

साबूदाण्याची (आगळी-वेगळी) जरा हटके खिचडी



साबूदाण्याची (आगळी-वेगळी) जरा हटके खिचडी

साहित्य : एक वाटी साबुदाणा,एक बटाटा,एक काकडी,एक कांदा,चार टेबलस्पून भट्टीवर भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट,एक चमचा साखर,चवीनुसार मीठ,एक वाटी चिरलेले कोथिंबीर ,दोन हिरव्या मिरच्या,एक आल्याचा तुकडा,दोन टेबलस्पून तूप,एक चमचा जिरे,दोन टेबलस्पून ओल्या नारळाचा चव.
कृती : या प्जरा हटके प्रकारच्या  खिचडीसाठी प्रथम   हिरवी मिरची -कोथिंबीर-आले मिक्सरवर वाटून त्यांची पेस्ट करून घ्या. कच्चा बटाटा किसून ठेवा. कांदा चिरून ठेवा. काकडीच्याही बारीक फोडी चिरून ठेवा. साबुदाणा भिजवून ठेवा. चांगला भिजला की त्यात शेंगदाण्याचे कूट,चवीनुसार मीठ व साखर घालून मिक्स करून ठेवा.
ही सगळी पूर्व तयारी झाली की मग  गॅसवर एका कढईत  फोडणीसाथी तूप गरम करून त्यात जिरे घाला, जिरे तडतडले की त्यात कोथिंबीर-हिरव्या मिरच्या-आले यांची मिक्सरवर वाटलेली पेस्ट घालून परतून घ्या मग  त्यात कच्चा किसलेला बटाटा व चिरलेला कांदा घालून परता,शेवटी बारीक चिरलेली काकडी घालून परतून घ्या आणे नंतर ,भिजवलेला साबुदाणा-शेंगदानयाचे कूट,चवीनुसार मीठ व साखर घालून मिक्स मिक्स करा आणि एक वाफ काढून साबुदाणा व बटाटा शिजला की गॅस बंद करा.
कोथिंबीर व हिरव्या मिरच्यांच्या वाटाणामुले खिचडीला छानसा हिरवा रंग येतो आणि आल्यामुळे चव पण वेगळी लागते !
सर्व्ह करतेवेळी खिचडी सर्व्हिंग डिशेसमध्ये काढल्यावर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ओल्या नारळाचा खोवलेला चव घालून सर्व्ह करा.
ब्रेकफास्ट साठी  ही खिचडी छान पर्याय आहे.