Tuesday 18 July 2017

व्रताचे खाणे - कच्च्या केळ्यांची शेव





साहित्य  :  एक मोठे कच्चे केळे,पाव वाटी आरारूट (तवकील), चवीनुसार एक चमचा मीठ,दीड चमचा लाल मिरचीचे तिखट,तळणीसाठी आवश्यकतेनुसार तेल.
कृती  : सालासकट कछे केळे कुकरमधून शिजवून घ्या. कुकरमधून काढून थंड झाल्यावर केळे सोलून घ्या व एका बाऊल मध्ये शिजलेले केळे हाताने कुस्करून त्याचा मऊ लगदा करून घ्या. मग त्यात आरारूट  (तवकील) पावडर आणि चवीनुसार मीठ व लाल मिरचीचे तिखट घालून मिक्स करा व गोला चांगला मळून मुरायला ठेवा.
दुसरीकडे गॅसवर एका कढईत शेव टाळण्यासाठी पुरेसे तेल गरम करून घेऊन मग त्या उकललत्या तेलात सोर्‍याचा वापर करून शेव पाडा. सोनेरी रंगावर शेव टाळून पेपर नॅप्किनवर काढा.
टीप :  १. याच पद्धतीने कच्च्या केळ्या ऐवजी उकडलेले बटाटे वापरुन बाटाट्याची शेव करता येईल.

२. सोर्‍या मध्ये शेवेच्या जागी चकल्यांची चकती वापरुन शेवेच्या जागी चकल्याही करता येतील. 

No comments:

Post a Comment