Tuesday, 18 July 2017

कुळथाची चटणीसाहित्य : एक वाटी कुळीथ,एकटेबलस्पून तेल,दोन टेबलस्पून उडदाची डाळ,अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा,दोन टेबलस्पून बारीक चिरलेला लसूण,चार लाल सुक्या मिरचयांचे तुकडे,मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर,अर्धी वाटी ओल्या नारळाचा खोवलेला चव,७-८ कढीपत्त्याची पाने,चवीनुसार मीठ,फोडणीसाठी दोन चमचे तेल,एक चमचा उडदाची डाळ,अर्धा चमचा मोहरी,एक छोटा चमचा हिंग,५-६ कढीपत्त्याची पाने,
कृती : गॅसवर एका नॉनस्टिक पॅनमध्ये मध्यम आंचेवर कुळीथ कोरडेच सुवास सुटेपर्यंत (सुमारे ५ मिनिटे) भाजून घ्या. मग ते भाजलेले कुळीथ एका पॅनमध्ये पाणी घेऊन त्यात एक तास भिजत घालून एक तासानंतर त्यातील पाणी काढून टाका व बाजूला ठेवा.
मग ते भाजून भिजवलेले  कुळीथ एका भांड्यात पाण्यात घालून प्रेशरकुकरमधून चार शिट्ट्यावर शिजवून घ्या. कुकर थंड होऊन वाफ जिरल्यावर कुकरचे झाकण काढून शिजलेल्या कुळीथातील पाणी काढून टाकून बाजला ठेवा.
गॅसवर एका नॉनस्टिकपॅनमध्ये फोडणीसाठी तेल गरम करून घ्या व त्या तापलेल्या तेलात उडदाची डाळ घालून ती  लालसर रंगावर  परतून घ्या व मग त्यात बारीक चिरलेला कांदा,लसूण व सुक्या लाल मिरचयांचे तुकडे घालून मध्यम आंचेवर तेही दोन मिनिटे परतून घ्या.आता त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा अर्धा मिनिट परतून घ्या व मग शिजवून ठेवलेले कुळीथ घालून मध्यम आंचेवर आणखी २-३ मिनिटे परटुन्न घेऊन गॅस बंद करा.
मिश्रण थोडेसे थंड झाले की मिक्सरच्याभांड्यात घाला व त्यात अर्धी वाटी पाणी आणि चवीनुसार मीठ  घालून जाडसर वाटून घ्या व नंतर मिक्सरमधून एका बाऊलमध्ये काढून घ्या.
आता गॅसवर एका पॅनमध्ये फोडणीसाठी तेल गरम करून घ्या. तेल चांगले गरम झाले की त्यात मोहरी टाका व ती छान तडतडली की उडदाची डाळ,हिंग व कढीपट्याची पाने घाला व मध्यम आंचेवर अर्धा मिनिट परतून घेऊन मग ती फोडणी बाऊलमध्ये काढून ठेवलल्या चचटणीवर ओता व चमच्याने चटणी कालवून मिक्स करा.
लगेच ही चटणी  रोटी किंवा चपाती सोबत सर्व्ह करा.
फ्रिजमध्ये ठेवल्यास ही चटणी ८-१० दिवस छान टिकते.