Sunday, 5 March 2017

साबूदाण्याची (आगळी-वेगळी) जरा हटके खिचडीसाबूदाण्याची (आगळी-वेगळी) जरा हटके खिचडी

साहित्य : एक वाटी साबुदाणा,एक बटाटा,एक काकडी,एक कांदा,चार टेबलस्पून भट्टीवर भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट,एक चमचा साखर,चवीनुसार मीठ,एक वाटी चिरलेले कोथिंबीर ,दोन हिरव्या मिरच्या,एक आल्याचा तुकडा,दोन टेबलस्पून तूप,एक चमचा जिरे,दोन टेबलस्पून ओल्या नारळाचा चव.
कृती : या प्जरा हटके प्रकारच्या  खिचडीसाठी प्रथम   हिरवी मिरची -कोथिंबीर-आले मिक्सरवर वाटून त्यांची पेस्ट करून घ्या. कच्चा बटाटा किसून ठेवा. कांदा चिरून ठेवा. काकडीच्याही बारीक फोडी चिरून ठेवा. साबुदाणा भिजवून ठेवा. चांगला भिजला की त्यात शेंगदाण्याचे कूट,चवीनुसार मीठ व साखर घालून मिक्स करून ठेवा.
ही सगळी पूर्व तयारी झाली की मग  गॅसवर एका कढईत  फोडणीसाथी तूप गरम करून त्यात जिरे घाला, जिरे तडतडले की त्यात कोथिंबीर-हिरव्या मिरच्या-आले यांची मिक्सरवर वाटलेली पेस्ट घालून परतून घ्या मग  त्यात कच्चा किसलेला बटाटा व चिरलेला कांदा घालून परता,शेवटी बारीक चिरलेली काकडी घालून परतून घ्या आणे नंतर ,भिजवलेला साबुदाणा-शेंगदानयाचे कूट,चवीनुसार मीठ व साखर घालून मिक्स मिक्स करा आणि एक वाफ काढून साबुदाणा व बटाटा शिजला की गॅस बंद करा.
कोथिंबीर व हिरव्या मिरच्यांच्या वाटाणामुले खिचडीला छानसा हिरवा रंग येतो आणि आल्यामुळे चव पण वेगळी लागते !
सर्व्ह करतेवेळी खिचडी सर्व्हिंग डिशेसमध्ये काढल्यावर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ओल्या नारळाचा खोवलेला चव घालून सर्व्ह करा.
ब्रेकफास्ट साठी  ही खिचडी छान पर्याय आहे.