Saturday, 14 January 2017

मेथी दुधी मसाला भाजीमेथी दुधी मसाला भाजी


साहित्य: एक जुडी मेथी, एक मध्यम दुधी भोपळा, तीन कांदे, दोन टोमॅटो,दहा -बारा लसणाच्या पाकळ्या, बोटभर आल्याचा तुकडा , एक चमचा गरम मसाला,एक चमचा लाल तिखट, अर्धी वाटी फ्रेश क्रीम, अर्धी वाटी दही, मीठ,तेल, हळद.
कृती: प्रथम मेथीची पाने खुडून घ्यावीत. धुवून चिरावीत. दुधी भोपळ्याची साले काढून घ्यावीत. त्याच्या आवडीप्रमाणे फोडी कराव्यात. फोडी कुकरमध्ये चाळणीत ठेवून वाफवून घ्याव्यात. धुवून व चिरून घ्या, दुधी भोपळ्याची साले काढून घेऊन त्याच्या  फोडी करून घ्या,. फोडी कुकरमध्ये चाळणीत ठेवून वाफवून घ्या, कांदे उभे चिरून घ्या, टोमॅटो बारीक चिरुन घ्या, लसणाच्या पाकळ्या सोलून घ्या, आल्यावरची साले काढून घ्या,गॅसवर एका पातेल्यात दोन चमचे तेल तापवून त्या तेलात कांदा टाकावा.तो लालसर रंगावर परतल्यावर त्यात लसूण, आले चिरून टाकावे. टोमॅटो घालावा. तेल सुटेपर्यंत परतावे. डिशमध्ये गार करायला ठेवावे. परत पातेल्यात चार चमचे तेल तापत ठेवावे. चिरलेली मेथी तेलावर परतावी. मेथी चागली परतल्यावर हळद ,तिखट घालावे. परतलेले कांदे,लसून,आले, टोमाटो बारीक वाटून घ्यावे. परतलेल्या मेथीमध्ये वाटप घालावे. फ्रेश क्रीम,दही,गरम मसाला घालावा. चवीनुसार मीठ घालावे. मिश्रण परतावे व त्यात वाफवलेल्या दुधी भोपळ्याच्या फोडी मिसळा. तेल सुटेपर्यंत भाजी परतावी.
 ही भाजी पोळीबरोबर गरमागरम खायला द्या,. 
टीप: दुधी भोपळा न खाणारी मुलेही आवडीने खातात.