Saturday, 14 January 2017

डोंगरी आवळे व ओल्या हळदीची चटपटी चटणीडोंगरी आवळे व ओल्या हळदीची चटपटी  चटणी

साहित्य : दोन मोठे तुकडे ओली हळद, ४-५ डोंगरी आवळे,आल्याचा तुकडा,पुदिन्याची पाने ,चवीनुसार हिरव्या  मिरच्या ,चवीनुसार मीठ,चवीपुरती साखर, चमचाभर लिंबाचा रस,जरुरीनुसार पाणी.
कृती : मिक्सरच्या चटणीच्या जारमध्ये ओल्या हळदीचे दोन मोठे तुकडे, आल्याचा एक तुकडा, चार ते पाच डोंगरी  आवळे (बिया काढून), पुदिन्याची मुठभर पाने, चवीनुसार हिरव्या  मिरच्या व चवीनुसार  मीठ व साखर, चमचाभर लिंबाचा रस आणि जरुरीनुसार पाणी घालून दोन मिनिटे फिरवून चटणी वाटून घ्यावी.