Monday 26 December 2016

पोपटीचे पोहे



पोपटीचे पोहे
साहित्य : चार वाट्या जाड पोहे,अर्धा वाटी पोपटीचे दाणे (वाल-पापडीचे /पावट्याचे) ,चवीनुसार ३-४ हिरव्या मिरच्या,एक छोटा चमचा हळद,एक चमचा लाल मिरचीचे तिखट,चवीनुसार मीठ,दोन टेबलस्पून तेल,फोडणासाठी जिरे,मोहरे,हळद,हिंग,५-६ कढी पत्त्याची पाने अर्धी मूठ बारीक चिरलेली कोथिंबीर,पाव वाटी सुके किसलेले खोरे किंवा ओल्या नारळाचा खोवलेला चव,अर्ध्या लिंबाचा रस.
कृती : प्रथम जाड पोहे पाण्याने धुवून घ्यावे व पाणी निथळण्यासाठी चाळणीत ठेवावेत. मग गॅसवर एका कढईत फोडणीसाठी तेल गरम करून घ्यावे व त्यात जिरे,मोहरी घालून दोन्ही चांगले तडतडल्यावर हळद व हिंग घालून थोडे परतून घेऊन मग त्या फोडणीत हिरव्या मिरचयांचे तुकडे व पावट्याचे दाणे घालून पुन्हा एकदा परतून घेऊन मग कढईवर झाकण ठेवून पावट्याचे दाणे वाफेवर शिजवून घ्यावेत. आता त्यात भिजवलेले पोहे,लाल मिरचीचे तिखट, चवीनुसार मीठ व लिंबाचा रस घालून कालवून मिक्स करून घ्यावे व मंद आंचेवर पोहे दोन मिनिटे परतून घेऊन गॅस बंद करावा.
थोड्या वेळाने कढईवरचे झाकण काढून पोपटी पोहे सर्व्हिंग डिशेस मध्ये काढून घेऊन त्यावर सुक्या खोबर्‍याचा कीस किंवा ओल्या नारळाचा खोवलेला चव आणि बारीक चिरलेल्या कोथिंबीरीने सजावट करावी व सर्व्ह करावेत.

No comments:

Post a Comment