Friday, 25 November 2016

मिक्स्ड व्हेजिटेबल चॉप्स

मिक्स्ड व्हेजिटेबल चॉप्ससाहित्य : तीन वाट्या मिक्स्ड व्हेजिटेबल्स (बीट,गाजर,घेवाड्याचा शेंगा,मटार,मका दाणे) दोन मोठे कांदे,चार हिरव्या मिरच्या,एक चमचा आल्याचा कीस,एक चमचा भाजलेले जिरे,दोन चमचे लाल लाल मिरचीचे तिखट,चवीनुसार मीठ,
तळणीसाठी आणि कांदा परतण्यासाठी गरजेनुसार तेल,दोन टेबलस्पून कॉर्नफ्लोअर,एक टेबलस्पून पाणी,एअर्धी वाटी ब्रेडचा चुरा.
कृती : प्रथम सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून घ्या. साले काढून घेऊन बारीक चिरून ठेवा.
मग या सगळ्या चिरलेल्या भाज्या प्रेशरकुकरच्या भांड्यात घेऊन त्यात जिरे पूड आणि मीठ घालून प्रेशरकुकरमधून तीन शिट्यांदेऊन शिजवून ठेवा.
थंड झाल्यावर प्रेशरकुकरमधून शिजलेल्या भाज्या चाळणीवर काढून गाळून घेऊन त्यातील पाणी काढून टाका व पाणी पूर्ण निथळण्यासाठी एक बाजूला ठेवा.
आता गॅसवर एका पॅनमध्ये तेल गरम करून घेऊन त्यात किसलेले आले,हिरव्या मिरचयांचे तुकडे व चिरून ठेवलेला कांदा घालून कांदा पारदर्शक होण त्याला गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत परतत रहा. परतून कांद्यचा रंग हवा तसा आला की त्यात प्रेशरकुकरमध्ये शिजवलेल्या भाज्या मॅश करून घेऊन घाला, तसेच चवीनुसार मीठ आणि मसाले घाला आणि उलथण्याने हलवून चांगले मिक्स करून घ्या. गॅस बंद करून मिश्रण एका बाऊलमध्ये काढून घ्या व बाजूला ठेवा.
मग त्यात कॉर्नफ्लोअर व पाणीघालून मिश्रण हाताने चांगले कालवून मिक्स करा.
आता या मिश्रणाचा लिंबाएव्हढा गोळा हार=तावर घेऊन त्याला लांबट गोल आकार द्या आणि मग तो प्रथम कॉर्नफ्लोअरमध्ये आणि नातर पावाच्या चुर्‍यात घोळवून घ्या व एका ताटात ठेवा. या प्रमाणे इतर चॉप्सही बनवून ठेवा.
आता गॅसवर एका पॅनमध्ये तळणीसाठी तेल गरम करत ठेवा. तेल चांगले तापुन त्याला उकळी आल्यावर गसची आंच मध्यम ठेऊन त्यात ताटात बनवून ठेवालेले चॉप्स सोडा आणि तळून त्यांचा गोल्डन ब्राऊन झाला की ते तयार झालेले चॉप्स पेपर नॅपकीनवर काढा. (म्हणजे त्यातील अतिरिक्त तेल पेपर शोषून घेईल)
हे गरमागरन मिक्स व्हेजिटेबल चॉप्स दुपारच्या चहा बरबर एखाद्या आवडत्या चटणी सह सर्व्ह करा.

No comments:

Post a Comment