Thursday 13 October 2016

फोडणीची भाकरी (किंवा पोळी अथवा भात)

फोडणीची भाकरी (किंवा पोळी अथवा भात) 


साहित्य :
ज्वारीच्या शिळ्या भाकर्‍या, गाजर, बीट कीसून आणि कच्चे मटाराचे कोवळे दाणे ,वाटीभर दही, हिरवी मिरची, कोथिंबीर, अर्धी मूठ शेंगदाणे, चवीप्रमाणे मीठ, चिमूटभर साखर, फोडणीसाठी तेल, जीरे, हिंग.
कृती:
शिळ्या ज्वारीच्या भाकर्‍यां अगदी बारिक कुस्करुन घ्या. मिक्सरमधून बारिक केल्या तरी चालेल. गॅसवर एका कढईत फोडणीसाठी तेल गरम करून त्या गरम तेलात हिंग-जिर्‍याची फोडणी करावी,त्यात कढीपत्त्याची पाने घालून परतून घ्यावीत व नंतर त्यामध्ये बारिक चिरलेली हिरवी मिरची, शेंगदाणे, किसलेले गाजर , बीट आणि कच्चे मटाराचे कोवळे दाणे घालून दोन मिनिटे परतून घ्यावे व कढईवर पाणी घालून एक ताट झाकण ठेवून मंद आंचेवर शिजू ध्यावे, मग कुस्करलेली भाकरी घालून परतावे व भाकरीचा कुस्करा वाफवून घ्यावा. नंतर त्यामध्ये दही, चिरलेली कोथिंबीर, मीठ, साखर घालून व झार्‍याने चांगले हलवून एकत्र मिक्स करून घेऊन एक वाफ काढून गॅस मंद करावा.
या डीशला शिळ्या भाकरीचा चिवडा असेही म्हटले जाते तर यालाच मराठवाड्यात ‘माणिक-पैंजण’ या भारदस्त नावाने ओळखले जाते.कोणी याला ‘साप्ताहिकी’ असेही म्हणतात. तर ही उपहाराची वन-डिश-मिल म्हणूनही ओळखली जाते. यात आपण इतर बर्‍याच भाज्या चिरून / किसून घालून याचे पोषण मूल्यही वाढवू शकतो. बर्‍याच लोकांना ही डिश एव्हढी आवडते की ही करता यावी म्हणून दोन भाकर्‍या जास्त करून मुद्दाम उरवतात.

No comments:

Post a Comment