Thursday, 20 October 2016

विर्दभ स्पेशल सोल्याची भाजी

विर्दभ स्पेशल सोल्याची भाजी

साहित्य : एक वाटी हिरव्या तुरीचे दाणे,एक बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेला टोमॅटो,एक चमचा आले-लसणाची पेस्ट, चवीनुसार २-३ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या,अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर,एक छोटा चमचा लाल मिरचीचे तिखट,एक छोटा चमचा हळद ,एक छोटा चमचा जिरे पूड,अर्धी वाटी तूप,एक टेबलस्पून तेल, चवीनुसार मीठ.
कृती :प्रथम गॅसवर एका पॅनमध्ये थोडसे तेल गरम करून त्यात हिरव्या तुरीचे दाणे २-३ मिनिटे परतून घेऊन एका थाळीत थंड होण्यासाठी काढून ठेवा.थंड झाल्यावर मिक्सरमधून जाडसर वाटून घ्या. उरलेल तेल त्याच पॅनमध्ये घालून गरम करावे व त्यात बारीक चिरलेला कांदा घालून पांच मिनिटे सोनेरी रंगावर परतून घेऊन मग त्यातच आल लसूण पेस्ट, हिरवी मिरची व कोथिंबीरिची पेस्ट घालून परतावे.नंतर लाल मिरचीची पूड, हळद व जिरे पूड घालून परतावे.
साधारण २-३ मिनिटांनी मिक्सरवर वाटून घेतलेले हिरव्या तुरीच्या दाण्यांचे वाटण घालावे.चवीनुसार मीठ घालावे.
पुरेसे पाणी व बारीक चिरलेला टोमॅटो घालावा.पॅनवर झाकण ठेवून ५-७ मिनिटे मंद आंचेवर शिजू दयावे.
गॅस बंद करून बाजूला करावे.चवीनुसार किंवा आवडीनुसार तूप घालून गरमच पोळी-चपातीसोबत सर्व्ह करावे.