Sunday, 14 August 2016

आचारी पोहेआचारी पोहे

साहित्य : तीन मुठी जाड पोहे(कांदा पोहयासाठी वापरतो ते), अर्धी वाटी बारीक चिरलेला कोबी,अर्धी वाटी मटारचे दाणे,अर्धी वाटी फ्लौवरचे बारीक चिरून तुरे,अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा, अर्धी वाटी बारीक चिरलेला टोमॅटो,अर्धी वाटी बारीक चिरलेल्या उकडलेल्या बटाट्याच्या फोडी,अर्धी मूठ शेंगदाणे,फोडणीसाठी एक टेबलस्पून तेल, दोन सुक्या मिरच्या,छोटा चमचा मोहरी,एक छोटा चमचा जिरे,चिमूटभर हळद,चिमूटभर हिंग,५-७ कढीपत्त्याची पाने, एक चमचा लाल मिरचीचे तिखट,चवीनुसार मीठ,दोन टेबलस्पून लोणच्याचा खार.
कृती : प्रथम जाड पोहे एका चाळणीत धुवून घ्या व एका बाजूला पाणी निथळत ठेवा. पाणीपूर्ण निथळल्यावर भिजवलेले पोहे एका स्टीलच्या थाळ्यात काढून घेऊन हाताने मोकळे करून घेऊन त्यात दोन टेबलस्पून कैरीच्या लोणच्याचा खार घाला व हाताने कालवून चांगले मिक्स करुण ठेवा.
आता गॅसवर एका पॅनमध्ये फोडणीसाठी तेल गरम करून घ्येऊन त्यात मोहरी, जिरे,कढीपत्त्याची पाने ,सुक्या लाल मिरच्या,हळद व हिंग  घालून  फोडणी करावी. नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून दोन मिनिटे परता व . एक वाफ काढावी,मग त्यात उकडलेल्या बटाट्याचे  तुकडे,बारीक चिरलेला कोबी, मटारचे दाणे,बारीक चिरलेले फ्लौवरचे तुरे,शेंगदाणेघालून एकत्र करावे. नंतर त्यात किंचीत लाल तिखट,मीठ, बारीक चिरलेला टोमॅटो घालून मिक्स करून घ्या व शेवटी दोन चमचे लोणच्याचा खार लावून ठेवलेले  पोहे घालावे व एक वाफ काढावी.