Thursday, 11 August 2016

मोड आलेल्या मेथीची पचडीमोड आलेल्या मेथीची पचडी

साहित्य : वाटीभर मोड आलेली मेथी, अर्धी वाटी गोडसर दही,चवीनुसार साखर व मीठ,चवीनुसार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या ,फोडणीसाठी मोहरी,हिंग व तेल.
कृती : मोडाची मेथी जरा वाफवुन घ्यावी. ती थंड झाल्यावर त्यात गोड दही बारीक चिरलेला कांदा चवीपुरते साखर मीठ आणि वरुन मोहरी,चिमूटभर हिंग आणि हिरव्या मिरचीची फोडणी द्यावी.
जेवणात खमंग तोंडीलावणे म्हणून वाढावी.