Monday 16 March 2015

चटपटे नमकीन अख्खे मसूर

चटपटे नमकीन अख्खे मसूर


साहित्य : एक वाटी अख्खे मसूर, पाव वाटी शेंगदाणे,एक वाटी बारीक शेव, दोन टेबलस्पून पंढरपूरी डाळं,अर्धा चमचा आमचूर पावडर,पाव चमचा लाल मिरचीचे तिखट,अर्धा चमचा चाट माला, पाव चमचा सैंधव मीठ,चवीनुसार मीठ,दोन टेबलस्पून भाजलेले तीळ व तळणीसाठी गरजेनुसार तेल

कृती : ८ ते १० तास आगोदर अख्खे मसूर भिजत घालून ठेवा. ८-१० तासा नंतर भिजवलेले मसूर पाण्यातून काढून एखाद्या सूती कापडावर अथवा पंचावर पसरून सुकवून घ्या.गॅसवर मोठ्या आंचेवर एका कढईत तेल भरपूर गरम करून त्यात भिजवून वाळवलेले अख्खे मसूर कुरकुरीत होईपर्यंत तळून पेपर नॅपकींवर पसरून टाका.त्याच तेलात शेंगदाणे, , पंढरपूरी डाळं व तीळ सुद्धा तळून घ्या.
एका मोठ्या बाउलमध्ये हे तळलेले अख्खे मसूर, पंढरपूरी डाळं, शेंगदाणे ,तीळ ,बारीक शेव, सैंधव मीठ,चवीनुसार मीठ व लाल तिखट घालून चमच्याने हलवून छान मिक्स करून घ्या.
हे चटपटीत नमकीन मसाला मसूर चाउ-माऊ म्हणून दुपारच्या चहा सोबत खायला उत्तम अगदी तोंडाला पाणी सुटेल असे लागतात. 


No comments:

Post a Comment