Friday 17 July 2015

चिंचेच्या पाल्याची चटणी



चिंचेच्या पाल्याची चटणी 

 
  
साहित्य : वाटीभर चिंचेचा पाला,एक टेबलस्पून धने,एक टेबलस्पून तीळ,३-४ लाल सुक्या मिरच्या,अर्धी वाटी सुक्या गोटा खोबर्‍याचे तुकडे,दोन चमचे तेल,पाव चमचा भाजलेली मेथीची पावडर,पाव छोटा चमचा हळद,चिमूटभर हिंग,एक चमचा गुलाची पावडर,चवीनुसार मीठ.
फोडणीसाठी : एक चमचा तेल,अर्धा चमचा मोहरी,अर्धा चमचा उडदाची डाळ,७-८ कढीपत्त्याची पाने.
कृती : चिंचेचा पाला हलकेच धुवून व सूती पंच्यावर टाकून वाळवून घ्या. (पाला धुतांना जास्त चोळू नका,कारण तसे केल्यास पाल्याचा आंबटपणा कमी होईल)
गॅसवर एका फ्राय पॅनमध्ये धने भाजून घ्या. ते एका वाटेत काढून बाजूला ठेवा व त्याच पॅनमध्ये तीळ भाजून घ्या. मग लाल सुक्या मारच्या भाजून घ्या.शेवटी सुक्या खोबर्‍याचे तुकडे भाजून घ्या.
मिक्सर ग्राइंडर मध्ये धने,तीळ,लाल सुक्या मिरच्या,भाजून घेतलेले सुक्या खोबर्‍याचे तुकडे,गुलाची पावडर आणि मीठ घालून वाटून घ्या.
आता त्याच फ्राय पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करून घेऊन त्यात हिंग,भाजलेली मेथीची पावडर व हळद घालून फोडणी करून घ्या. फोडणी १-२ मिनिटे परतून घेतल्यावर त्यात चिंचेचा पाला घालून परतून घ्या.
आता मिक्सरच्या ग्राईंडरमध्ये हे फोडणीत परतलेल्या चिंचेच्या पाल्याचे मिश्रण व आगोदर करून ठेवलेले वाटण एकत्र कारुन  थोडेसे पाणी घाला व चटणी वाटून घ्या.  
गॅसवर पुन्हा फ्राय पॅनमध्ये तेल गरम करून घेऊन त्यात मोहरी घालून ती तडतडल्यावर त्यात उडदाची डाळ घालून गोल्डन ब्राऊन रंगावर परतून घ्या व मग कढीपत्त्याची पाने घालून एक मिनिट परतून घेऊन गॅस बंद करा.
ही फोडणी चटनिवर ओटा व कालवून घ्या.
गरम भात किंवा पोळी सोबत सर्व्ह करा.


मसालेदार लसूणी-बटाटा भाजी

मसालेदार लसूणी-बटाटा भाजी


साहित्य : १०-१२ छोटे बेबी बटाटे , १०-१२ लसणाच्या पाकळ्या ,एक छोटा कांदा-बारीक चिरून, एक इंच आल्याचा तुकडा- बारीक चिरून , तीन काश्मिरी लाल मिरच्या, एक माध्यम आकाराचा टोमॅटो-बारीक चिरून,एकेक चमचा धने-जिरे पूड, अर्धा चमचा लाल मिरचीचे तिखट, अर्धा चमचा चाट मसाला, चिमूटभर हळद ,चवीनुसार मीठ ,अर्धा चमचा गरम मसाला, दोन डाव तेल ,बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती : सुक्यालाल काश्मिरी मिरच्या दहा मिनिटे भिजत घालून ठेवा. प्रेशरकुकरमधून छोटे बेबी बटाटे छोटा चमचा मीठ घालून उकडून व सोलून घ्या.
आले,लसूण,भिजत घातलेल्या काश्मिरी लाल मिरच्या,टोमॅटो,धने-जिरे पावडर व चिमूटभर हळद घालून मिक्सरमध्ये वाटून घेऊन टोमॅटो-लसूण पेस्ट बनवून ठेवा.
गॅसवर एका नॉनस्टिक कढईत एक टेबलस्पून तेल गरम करुन त्यात उकडून ठेवलेले बटाटे दोन मिनिटे परतून घ्या.त्यावर गरम मसाला व चाट मसाला भुरभुरून  पुन्हा दोन मिनिटे परतून घ्या व गॅस बंद करून मसाल्यात परतलेले   बटाटे एका दुसर्‍या पातेल्यात काढून  घ्या.
नंतर त्याच नॉनस्टिक कढईत चार टेबलस्पून तेल गरम करून घेऊन त्यात बारीक चिरलेला कांदा घासलून सोनेरी रंगावर परतून घ्या. मग त्यात आधी बनवून ठेवलेली टोमॅटो-लसूण पेस्ट घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्या.नंतात लाल मिरचीचे तिखट घालून चांगले मिसळून घ्या व शेवटी परतून ठेवलेले बटाटे घालून पाच मिनिटे शिजवून घ्या. 
गॅस बंद करून ही मसालेदार लसूणी-बटाट्याची भाजी सर्व्हिंग बाउलमध्ये काढून घ्या. वर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरम गरम लसूणी-बटाट्याची  मसालेदार भाजी सर्व्ह करा.





Tuesday 31 March 2015

मसाला-बटाटा ब्रेड टोस्ट सँडविच

मसाला-बटाटा ब्रेड टोस्ट सँडविच


साहित्य: एक स्लाईस  ब्रेड , ४ते ५ टेस्पून अमूल बटर , सॅंडविचमध्ये भरण्याचे सारण म्हणून दोन वाट्या मटार-कांदा-बटाट्याची झणझणीत मसाला भाजी,फोडणीसाठी: १ टीस्पून तेल, चिमूटभर मोहोरी ,जिरे,चिमूटभर हिंग, १/४ टीस्पून हळद , ४ ते ५ कढीपत्ता पाने (बारीक चिरून),दोन चमचे आले-लसूण पेस्ट,चवीनुसार मीठ,एक वाटी हिरवी कोथिंबीर-खोबर्‍याची चटणी

कृती :
सॅंडविचमध्ये भरण्यासाठी सारण-मसाला (भाजी) : बटाटे सोलून मॅश करून घ्यावेत. गॅसवर एका कढईत तेल गरम करून घेऊन मोहोरी,जिरे,हिंग, हळद आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. त्यात हिरवी मिरची पेस्ट आणि आलेलसूण पेस्ट घालून १५ सेकंद परतावे. कांदा घालून परतावे आणि झाकण ठेवून मिनिटभर शिजू द्यावे. नंतर मटार घालून झाकण ठेवून मटार शिजू द्यावे. शेवटी  मॅश केलेले बटाटे घालावे. मिक्स करावे आणि वर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून झाकण ठेवून २-३ मिनिटे वाफ काढावी.
ब्रेड स्लाईसच्या एका बाजूला बटर लावावे. अमूलचे बटर लावलेल्या ८ पैकी ४ स्लाईस घेवून त्याला चटणी लावावी.
चटणी लावलेल्या ब्रेडवर तयार मसाल्याचा पातळ थर लावून घ्यावा. त्यावर कांद्याची एक चकती ठेवावी. वरती बटर लावलेला ब्रेड स्लाईस ठेवून किंचित प्रेस करावे.
बाहेरून थोडेसे बटर लावून सॅंडविच टोस्टरमध्ये सॅंडविच टोस्ट करून घ्यावे

गरम सॅंडविच हिरवी चटणी किंवा टोमॅटो केचपबरोबर सर्व्ह करावे.



Monday 16 March 2015

चटपटे नमकीन अख्खे मसूर

चटपटे नमकीन अख्खे मसूर


साहित्य : एक वाटी अख्खे मसूर, पाव वाटी शेंगदाणे,एक वाटी बारीक शेव, दोन टेबलस्पून पंढरपूरी डाळं,अर्धा चमचा आमचूर पावडर,पाव चमचा लाल मिरचीचे तिखट,अर्धा चमचा चाट माला, पाव चमचा सैंधव मीठ,चवीनुसार मीठ,दोन टेबलस्पून भाजलेले तीळ व तळणीसाठी गरजेनुसार तेल

कृती : ८ ते १० तास आगोदर अख्खे मसूर भिजत घालून ठेवा. ८-१० तासा नंतर भिजवलेले मसूर पाण्यातून काढून एखाद्या सूती कापडावर अथवा पंचावर पसरून सुकवून घ्या.गॅसवर मोठ्या आंचेवर एका कढईत तेल भरपूर गरम करून त्यात भिजवून वाळवलेले अख्खे मसूर कुरकुरीत होईपर्यंत तळून पेपर नॅपकींवर पसरून टाका.त्याच तेलात शेंगदाणे, , पंढरपूरी डाळं व तीळ सुद्धा तळून घ्या.
एका मोठ्या बाउलमध्ये हे तळलेले अख्खे मसूर, पंढरपूरी डाळं, शेंगदाणे ,तीळ ,बारीक शेव, सैंधव मीठ,चवीनुसार मीठ व लाल तिखट घालून चमच्याने हलवून छान मिक्स करून घ्या.
हे चटपटीत नमकीन मसाला मसूर चाउ-माऊ म्हणून दुपारच्या चहा सोबत खायला उत्तम अगदी तोंडाला पाणी सुटेल असे लागतात.