Saturday 22 February 2014

कोबी भात


कोबी भात


साहित्य ४ वाट्या  चिरलेला कोबी , एक वाटी तांदूळ, अर्धी मूठ मूगडाळ, एक चमचा धनेपूड, फोडणीसाठी एक डाव तेल, मोहरी, जिरे, चवीनुसार मीठ, एक मूठभर भाजलेले/तळलेले शंगदाणे, १०-१२ कढीपत्त्याची पाने, चिमूटभर हिंग, ५-६ पाकळ्या बारीक चिरलेला लसूण, एक चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, डू चमचे लिंबाचा रस , एक वाटी मटाराचे दाणे (मक्याचेही चालतील), २ते २.५ वाट्या, दोन चमचे साजूक तूप
कृती : तांदूळ, मूगडाळ धूवून निथळत ठेवा,कुकरमध्ये तेल घेऊन त्यात जिरे-मोहरी, कढिपत्ता, हिंग घालून फोडणी करा, मग त्यात बारीक चिरलेला लसूण घालून परता,नंतर हळद, चिरलेला कोबी, मटार (किंवा मक्याचे दाणे) घालून परता, शेवटी डाळ-तांदूळ घालून परता,आता त्यात तिखट, मीठ, धनेपूड, लिंबाचा रस घालून परता , दोन चमचे साजूक तूप घाला आणि परता,परतल्यानंतर त्यात दोन अडीच वाट्या पाणी घाला. परत एकदा चव बघून चवीनुसार तिखट, मीठ, लिंबाचा रस घालून कुकरला झाकण लावून ३ शिट्ट्या करा.
गरमा-गरम कोबीभातात शेंगदाणे घालून मिसळून घ्या व सर्व्ह करा.


No comments:

Post a Comment