Friday 21 February 2014

तिखट मिठाच्या पुर्‍या

तिखट मिठाच्या पुर्‍या

साहित्य : एक वाटी कणीक,अर्धी वाटी मैदा,दोन चमचे तांदूळाची पिठी,एक मोठा चमचा तिळ,एक छोटा चमचा ओवा,चवीपुरते तिखट व मीठ,पुर्‍या तळणीसाठी तेल,एक छोटा चमचा जिरे.
कृती :  एका मोठ्या परातीत कणीक,मैदा,व तांदूळाची पिठी घेऊन कोरडीच सर्व पिठे एकत्र करुण घ्यावीत,मग त्यात भाजून घेततेले तीळ ,ओवा व जिरे घालावे,तसेच चवीनुसार लाल तिखट व मीठ घालून पुन्हा एकदा कोरडेच मिक्स करून घ्यावे,दुसर्‍या एका भांड्यात गरम पाणी व कडकडीत तेलाचे मोहन घेऊन ते चांगले फेटून घ्या व नंतर ते फेटलेले गरम  तेल-पाणी वापरुन पुर्‍यांचे पीठ भिजवा व चांगले मळून परातीतच १०-१५ मिनिटे झाकून ठेवा.
गॅसवर कढईत पुर्‍या तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवून तेल चांगले तापल्यावर पोळपाटावर एकदम पात्तळ अशा पुर्‍या लाटून घेण तेलात टाकून तळून काढा व तेल निथळण्यासाठी चाळणीत ठेवा.
गार झाल्यावर घट्ट झाकणाच्या स्टीलच्या डब्यात भरून ठेवा.
ह्या पुर्‍या बरेच दिवस टिकतात त्यामुळे प्रवासात न्यायला किंवा दुपारच्या चहा बरोबर चाउ-म्याऊ म्हणून खायला उत्तम ! 

No comments:

Post a Comment