मेथी बटाटा पुरी
साहित्य : एक वाटी भरून ताजी स्वच्छ धुवून बारीक चिरलेली
मेथी,एक
मोठ्ठा बटाटा उकडून कुस्करलेला ,तीन चमचे चणा डाळीचे (बेसन)
पीठ,अर्धी वाटी ज्वारीचे पीठ ,एक वाटी कणीक
(गव्हाचे पीठ),एक चमचाभर पांढरे तीळ,चवीनुसार
मीठ व लालतिखट किंवा वाटलेली हिरवी मिर्ची,दोन-तीन लसणाच्या
पाकळ्या ठेचून,थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर,आवशकतेनुसार तळणीसाठी गरम तेल
कृति : वर दिलेले सर्व साहित्य एकत्र करून थोडेसे पाणी घालून पुर्यांसाठी मऊसर पीठ भिजवावे, ओल्या प्लॅस्टिकच्या कागदावर हाताने गोलसर पुर्या थापून गॅसवर कढईत कडक तेलात सोनेरी रंगावर तळाव्यात.
कृति : वर दिलेले सर्व साहित्य एकत्र करून थोडेसे पाणी घालून पुर्यांसाठी मऊसर पीठ भिजवावे, ओल्या प्लॅस्टिकच्या कागदावर हाताने गोलसर पुर्या थापून गॅसवर कढईत कडक तेलात सोनेरी रंगावर तळाव्यात.
या
झाल्या खमंग मेथी-बटाटा पुर्या तय्यार !
सर्व्ह
करतांना सोबत खाराच्या मिरच्या, लोणचे, किंवा एखादी चटणी
वगैरे तोंडीलावणे द्यावे.
No comments:
Post a Comment